बॉलिवूडची अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सलमान खानवर जोरदार टीका केली आहे. सलमान आणि भाग्यश्रीच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सोमी अलीने लोकांना सलमान खानची पूजा करणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये सलमान खानचे नाव लिहिले नाही, मात्र फोटो शेअर करताना तिने अभिनेत्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

 “फक्त मलाच नाही तर इतरही अनेक महिलांना मारहाण करणारा. त्याची पूजा करणे थांबवा. तो एक मानसिक आजारी व्यक्ती आहे. तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाहीये,” असं सोमीने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

सोमी अलीची इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, सोमीने सलमानवर टीका करण्याची किंवा मारहाणीचा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिने जाहीरपणे सलमानचे नाव न घेता या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. सोमीने सलमानला बॉलिवूडचा हार्वे वाइनस्टीन म्हटलं होतं. हॉलिवूड अभिनेता हार्वे वाइनस्टीन याच्यावर अनेक महिला आणि अभिनेत्रींना धमक्या देण्याव्यतिरिक्त बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप आहे, याचा संदर्भ देत सोमी म्हणाली होती की, “बॉलिवूडचा हार्वे वाइनस्टीन एक दिवस तुझाही पर्दाफाश होईल. ज्या महिलांना तू मारहाण केलीस, त्या महिला एक दिवस सर्वांसमोर येतील आणि ऐश्वर्या रायप्रमाणे सत्य सांगतील,” असं म्हटलं होतं.

हेही वाचा – ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नाचं उत्तर येत नसल्याने तरुणानं सोडला केबीसी शो; तुम्हाला उत्तर माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमी अली ही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आहे. संगीता बिजलानीपासून वेगळे झाल्यानंतर सलमान आणि सोमी रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. दरम्यान, सलमानशी नातं तुटल्यानंतर सोमीने बॉलिवूड सोडलं आणि ती परदेशात निघून गेली. परंतु इतकी वर्षे होऊनही ती अनेकदा सलमानवर टीका करत असते.