सलमान खान त्याची आई सलमा आणि वडील सलीम खान यांच्या खूप जवळचा आहे. त्यांचे नाते इतके घनिष्ठ आहे की, सुपरस्टार झाल्यानंतरही तो त्यांच्याबरोबर एकाच घरात राहतो. आता अभिनेत्याच्या पालकांचा एक गोंडस व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ८९ वर्षीय सलीम खान त्यांच्या ७९ वर्षीय पत्नी सलमा यांना त्यांच्या हातांनी जेवण भरवताना दिसत आहेत. सोहेल खानने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सलमान खानच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये एक खास नाते दिसून आले आहे. हे कुटुंब प्रत्येक कठीण काळात एकत्र उभे राहिले आहे. ते प्रत्येक सण आणि पार्टी एकत्र साजरी करतात. अशा परिस्थितीत चाहत्यांनाही हा गोंडस व्हिडीओ आवडला आहे. वयाच्या या टप्प्यावर दोघांमधील नाते आणि प्रेम चाहत्यांना आवडले आहे. व्हिडीओ शेअर करताना सोहेलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘सर्वांत प्रेमळ जोडपे’.

सुनील शेट्टी आणि सलमान खानची कथित प्रेयसी लुलिया वंतूरसह अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “या वयातच सहवासाची गरज असते.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “हेलन यांच्याबरोबर ही जोडी चांगली दिसते.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘हे सर्वांत गोंडस कुटुंब आहे.”

सलीम खान आणि सलमा यांनी १९६४ मध्ये त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. सुरुवातीला सर्व जण या लग्नाच्या विरोधात होते; पण नंतर सर्व जण एकत्र आले. १९७० आणि १९८० च्या दशकात हेलन सलीम खान यांच्या आयुष्यात आल्याने या लग्नात समस्या निर्माण झाल्या. काही वर्षे नात्यात मतभेद होते. पण शेवटी, ते सर्व एक मजबूत कुटुंब म्हणून एकत्र आले. आजपर्यंत हेलन खान कुटुंबाचा एक भाग आहेत.

अभिनेता सलमान खान याचे वडील व लेखक सलीम खान आजही त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सलीम खान विवाहित आणि चार मुलांचे पिता असतानादेखील त्यांनी दुसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतला. १९८१ मध्ये सलीम खान यांनी अभिनेत्री हेलन यांच्याबरोबर दुसरं लग्न केलं. सलीम खान यांनी दुसरं लग्न केल्यानंतर पहिली पत्नी सलमा खान यांना फार मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर, वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर सलमान खान आणि भावंडंदेखील नाराज होती.