करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्याने सगळेच घरात अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या आपल्या कुटुंबापासून दूर पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये राहत आहे. सलमान खानने स्वत: व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली होती. या व्हिडीओत सलमान खानसोबत त्याचा भाचा निर्वानदेखील होता. दरम्यान सलमानने आपल्या इन्स्टाग्रामवर अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत सलमान खान घोड्याला चारा भरवताना दिसत आहे. विशेष म्हणजे घोड्याला चारा भरवण्याआधी सलमान खान स्वत: घोड्याचा चारा खात आहे आणि नंतर घोड्याला भरवत आहे.

सलमान खानने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे की, “Breakfast With my Love”. सलमानचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. एका चाहत्याने म्हटलं आहे की, Simplicity Level: Infinity… तर काहीजणांना सलमान खानला करोनाची भीती असल्याने चारा धुवून खा असा सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Breakfast with my love…

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

लॉकडाउनमध्ये असल्याने सलमान खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. याआधी सलमान खानने एक फोटो शेअर करत रस्त्यावर लोकांची गर्दी नसल्याने गांभीर्य समजून घेतल्याबद्दल आभार मानले होते.


सलमान खानकडून १६ हजार कामगारांच्या खात्यात ४ कोटी ८० लाख रुपये जमा

सलमान खानने चित्रपटसृष्टीतीला २५ हजार कामगारांना मदत करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार त्याने मदत करण्यास सुरुवात केली आहे. सलमान खानने १६ हजार कामगारांच्या खात्यात एकूण चार कोटी ८० लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. आगामी दिवसांमध्ये परिस्थिती पाहता पुढील महिन्यात ही मदत वाढवली जाणार आहे. तसंच सलमान खान मे महिन्यात आणखी १९ हजार कामगारांना मदत करणार आहे.

सलमान खानने आपण चित्रपटष्टीतील कामगारांना १० कोटी ५० लाख रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यातील पहिल्या टप्प्यात त्याने १६ हजार कामगारांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात सलमान खान १९ हजार कामगारांना मदत करणार असून पाच कोटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे.