सलमान खानच्या ‘अंतिम’चे आणखी एक मोशन पोस्टर प्रदर्शित, आयुष शर्माचा लूक समोर

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

राज्यातील चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता सिनेसृष्टीत पुन्हा नवचैतन्य पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या जात आहे. दरम्यान सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर आता त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील चित्रपटगृहात ‘अंतिम’ प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे आणखी एक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यात अभिनेता आयुष शर्मा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे.

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नुकतंच सलमानने या चित्रपटाचे आणखी एक मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यात मोशन पोस्टरमध्ये आयुष शर्मा हा शर्टलेस अवतारात पाहायला मिळत आहे. यात आयुषची जबरदस्त बॉडी, अ‍ॅब्स आणि मसल्सही पाहायला मिळत आहे. त्यासोबत त्याच्या गळ्यात सोन्याची चेन पाहायला मिळत असून त्यावर आर अक्षर असलेले लॉकेट दिसत आहे. आयुषचा हा लूक पाहून अनेकांनी खतरनाक, जबरदस्त अशा अनेक कमेंट केल्या आहेत. “अंतिम मे जब राहुल बना राहुलिया, थिएटर्स भी खुल गये”, असे कॅप्शन सलमानने या पोस्टरला दिले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमानने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. यात सलमानचा आगळावेगळा लूक पाहायला मिळत होता. त्यामुळे ते पोस्टर चर्चेचा विषय ठरत होते. यानंतर आता आयुषचे हे मोशन पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील चित्रपटगृहात ‘अंतिम’ प्रदर्शित होणार आहे. “तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल”, अशी मला आशा आहे,” असे कॅप्शन सलमानने या मोशन पोस्टरला दिले आहे.

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan introduces aayush sharma character rahulia bhai in antim the final truth nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या