बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. यशराज प्रोडक्शन निर्मित टायगर या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात हे एकत्र काम करताना दिसतील. काही दिवसांपुरवी या दोघांचा लोकप्रिय चित्रपट ‘टायगर ३’ याचे शूटिंग सुरू झाले असल्याची बातमी समोर आली होती. आता या फ्रँचाईझीचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटिस येणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी ही टीम परदेशी गेले आहे.
‘टायगर ३’या चित्रपटचा निर्माता आदित्य चोप्राने टीमसाठी खास सोय केली आहे. एकंदरीत बाहेरची परिस्थिती बघता त्याने संपूर्ण टिमसाठी एक खास जेटची सोय केली आहे. हाती आलेल्या माहिती नुसार ही टिम १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या परदेशी चित्रीकरणासाठी रवाना झाली आहे. या परदेशी शूटिंगसाठी दिग्दर्शक मनीष शर्मा बऱ्याच महिन्यांपासून प्लान करत होता. हे चित्रीकरण कोणते ही विघ्न न येता पार व्हावे म्हणून सगळी काळजी घेण्यात येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण रशिया, टर्की, ऑस्ट्रेलिया सोबतचं इतरही देशात करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
सलमान आणि कतरिना स्टारर ‘टायगर’ या चित्रपटाचे पहिले दोन भाग प्रेक्षकांना आवडले आहेत. त्यामुळे आता ते या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. या फ्रॅंचायझीच्या पहिल्या भाग ‘एक था टायगर’चे दिगर्दशन हे कबीर खानने केले होते. हा चित्रपटाची थीम स्पाय थ्रिलर असून हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग ‘टायगर जिंदा हैं’ हा २०१७ साली प्रदर्शित झाला होता. त्यामुळे पॅनडॅमिक असले तरी चित्रपटाच्या बाबतीत निर्माता आणि दिग्दर्शकाला कोणत्या ही प्रकारची तडजोड करायची नाही आहे, कारण हा चित्रपट प्रेक्षक चित्रपटगृहात पाहणार आहेत. त्यामुळे त्यांना सगळं व्यवस्थित व्हायला हवे आहे.
‘टायगर ३’यात सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसेल. तर कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे. यात आभिनेता इमरान हाशमी खलनायकेच्या भूमिकेत दिसेल. याआधी सलमान आणि कतरिनाने अली अब्बास जाफरच्या ‘भारत’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.