‘या’ कारणामुळे कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नात सलमान लावणार नाही हजेरी

कतरिना आणि विकी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

salman khan, katrina kaif, vicky kaushal,
कतरिना आणि विकी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. त्यात आता त्या दोघांच्या लग्नाला येणाऱ्या पाहूण्याींची लिस्ट समोर आल्याचे म्हटले जात आहे.

कतरिना कबीर खानला तिच्या कुटुंबाचा एक सदस्य मानते. तर असं म्हटलं जातं की दिवाळीत त्यांच्याच घरी कतरिना आणि विकीचा रोका झाला. कतरिना त्यांना भाऊ मानते. दुसरीकडे ट्युबलाइट या चित्रपटा दरम्यान, कबीर खान आणि सलमानमध्ये वाद झाल्याचे म्हटले जाते. ज्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले.

आणखी वाचा : KBC 13 : उंच आहात तर घरातील पंखे तुम्ही साफ करता का? एका लहान मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे बिग बींनी दिले भन्नाट उत्तर

कतरिनाच्या लग्नात सलमान न येण्याच दुसरं कारण म्हणजे डिसेंबर महिन्यात त्यांची बरीच काम आहेत. सलमान त्यावेळी शाहरुखसोबत पठान चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे. कारण चित्रीकरण सुरु असताना आर्यनच्या अटकेनंतर त्यांना चित्रीकरण थांबवावे लागले. हे सगळं कतरिनाच्या लग्नाच्या तारेखच्या जवळपास होतं. रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत.

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिं’ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan not to attend vicky kaushal and katrina kaif wedding due to this reason dcp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या