बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या कुटुंबासोबत वांद्रे पश्चिमेकडील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. या व्यतिरिक्तही सलमानने मुंबईत अनेक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र नुकतंच सलमानने त्याच्या वांद्र्याच्या घराजवळच एक ड्युप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला आहे. याबाबतचा भाडे करार नुकताच समोर आला.

एका रिअल इस्टेट पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, सलमानने व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने वांद्रे पश्चिमेकडील मकबा हाईट्स या टॉवरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. हा ड्युप्लेक्स फ्लॅट असून तो १७ आणि १८ व्या मजल्यावर आहे. नुकतंच याबाबतचे भाडे करारपत्र समोर आले आहे. हा फ्लॅट मालिक बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांचा आहे.

या फ्लॅटचा कार्पेट एरिया हा २ हजार २६५ स्के.फूट इतका आहे. सलमानने ११ महिन्यांसाठी हा फ्लट भाड्याने घेतला आहे. यासाठी त्याला दर महिना 8.25 लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे. सलमानने भाड्याने घेतलेला हा फ्लॅट त्याच्या कंपनीच्या कामासाठी घेतल्याचे बोललं जात आहे.

दरमयान सलमान खानने नुकतंच त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सलमानने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘अंतिम’ चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले. यात सलमानचा आगळावेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. सलमानने हे मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील चित्रपटगृहात ‘अंतिम’ प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा – Antim Poster : आरारारारारा खतरनाक…! सलमान खानच्या ‘अंतिम’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

या सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.