salman khan recalls making bike on his own : सलमान खानला मोटारसायकली खूप आवडतात. अलीकडेच त्याने याबद्दल सांगितले आणि स्वतः बाईकवर स्टंट करण्याची त्याची आवड सांगितली आहे.

सलमानने त्याच्या सुरुवातीच्या काळातील एक मनोरंजक गोष्टदेखील सांगितली, जी फार कमी लोकांना माहिती आहे. सलमानने सांगितले की त्याने स्वतः बाईक कशी बनवली होती, पण ती फक्त तो एकदाच चालवू शकला.

सलमानने स्वतः बनवली होती बाईक

इंडिया टुडेला दिलेल्या एका खास मुलाखतीत, सलमानने इंडियन सुपरक्रॉस लीगच्या सीझन २ च्या लाँचिंगमधील त्याचा अनुभव सांगितला. अभिनेता म्हणाला, “माझा एक मित्र सलीम होता, ज्याने यापूर्वी ‘बागी’, ‘जागृती’ आणि ‘हिरो’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. तो बाईक डीलर होता. मी बाईकचे इंजिन पडलेले पाहिले आणि संपूर्ण बाईक स्वतः बनवण्याचा विचार केला. त्यावेळी दिलावर खान नावाचा एक स्टंटमॅन होता, आता ते दोघेही नाहीत.”

सलमान पुढे म्हणाला की, मी सलीमकडून इंजिन घेतले, महाराष्ट्र गॅरेजमध्ये गेलो, तिथून टायर विकत घेतले. संपूर्ण बाईक मी स्वतः बनवली. त्यावेळी माझ्या वडिलांची गाडी रंगवली जात होती, म्हणून मी तिचा मडगार्ड आणि टँक घेतला आणि बाईकमध्ये बसवला. संपूर्ण बाईक बनवण्यासाठी दीड ते दोन महिने लागले. ज्या दिवशी मी पहिल्यांदा बाईक चालवली, त्या दिवशी सलीमने (सलमानचा मित्र) माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, ही तीच बाईक आहे जी माझ्याकडून घेतलेल्या इंजिनपासून बनवली आहे. सलमान हसून म्हणाला की दुसऱ्या दिवशी तो आला आणि मी झोपेत असताना फिल्म सिटीच्या तलावात बाईक टाकून दिली. तलावात टाकून दिल्यावर बाईक खराब झाली. मी फक्त एकदाच ती चालवू शकलो, तीही दीड ते दोन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर.

जेव्हा त्याला विचारण्यात आले की, त्याने चित्रपटांमध्येही बाईकवर स्टंट केले आहेत का? सलमान म्हणाला- हो, मी ते केले आहेत. पण, बहुतेकदा मी जुहू बीचवर सराव केला. त्यावेळी बॉबी देओलही प्रशिक्षण घेत होता. बॉबीला स्टंटमध्ये फारसा रस नव्हता, विशेषतः रॅम्पवरून उडी मारण्यात, पण मी ते करायचो, कारण मला ते आवडायचे. बॉबी निघून गेल्यावर टिनू वर्मा मला स्टंट करायला लावायचा. आम्ही घोडेस्वारी आणि बाइकिंग दोन्हीचा सराव करायचो. आजही आमच्या फार्महाऊसमध्ये रॅम्प आहेत.

सलमानने बाईकबद्दलचे प्रेम व्यक्त केले, पण त्याच वेळी त्याने एका मोठ्या समस्येबद्दलही सांगितले. अभिनेत्याने सांगितले की भारतात मोटरस्पोर्ट्ससाठी योग्य पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सलमान म्हणाला, मला वाटतं आपल्या देशात खेळांना खूप वाव आहे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि बहुतेक बाईक आणि स्कूटर इथे विकल्या जातात. पण, इथे मुले आणि तरुणांसाठी अशी जागा नाही जिथे ते बाईकिंग, रायडिंग, मोटोक्रॉस किंवा सुपरक्रॉस करू शकतील. त्यांच्यासाठी ना चांगली पायाभूत सुविधा आहे, ना लीग.

जर त्यांना प्रशिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना परदेशात जावे लागते. आपल्याकडेही या सुविधा असू शकतात. लीग तयार करता येतील, रायडर्सना प्रशिक्षण देता येईल, सायकलिंग करता येईल आणि त्यांच्यासाठी योग्य सेटअप उपलब्ध करून देता येईल. मग आपण भारताकडून जागतिक अजिंक्यपद जिंकण्याचे स्वप्नदेखील पाहू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर सलमान खान त्याचा पुढचा चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये दिसणार आहे. तो त्यासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे.