Salman Khan Cryptic post went viral : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. तो अनेकदा इतरांच्या चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसतो. पण, आता सलमानने एक पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

या पोस्टमध्ये त्याने त्याचे वडील सलीम खान यांच्याकडून मिळालेल्या एका महत्त्वाच्या सल्ल्याचा उल्लेख केला आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सलमानने स्वतःचा एक उदासीन हावभाव असलेला फोटोदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे.

सलमान खानची पोस्ट

सलमानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “वर्तमान तुमचा भूतकाळ बनतो आणि भूतकाळ तुमच्या भविष्याशी टक्कर देतो. वर्तमान ही एक देणगी आहे, तिच्याशी योग्य वागा. वारंवार पुनरावृत्ती होणारी चूक सवय बनते आणि ती नंतर तुमचे चारित्र्य बनते. दुसऱ्या कोणालाही दोष देऊ नका, जोपर्यंत तुम्ही स्वतः इच्छित नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला काहीही करायला लावू शकत नाही.”

सलमानने पुढे सांगितले की, त्याच्या वडिलांनी हे अलीकडेच सांगितले आहे. त्याने लिहिले, “माझ्या वडिलांनी मला हे नुकतेच सांगितले आहे. हे अगदी खरे आहे. मी हे लवकर ऐकले असते तर बरे झाले असते. पण, कधीच उशीर होत नाही.” या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लिहिले आहे की, ‘कदाचित भाईजानला त्याच्या चुका कळल्या असतील’, तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘असे दिसते की सलमान बदलला आहे.’

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर सलमान खान लवकरच ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये आला होता. आता चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहात आहेत. याशिवाय, सलमानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील लष्करी संघर्षावर आधारित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.