बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील नातं सर्वांनाच माहित आहे. या दोघांमधली मैत्री सगळ्यांना ठावूक आहे. शेराने नुकताच सलमानचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ यातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शेराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत शेरा सोबत सलमान दिसत आहे. सलमान त्याच्या विचारत असल्याचे दिसत आहे. सलमानने काळ्यां रंगाची बंडी आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली असून त्याने लाल रंगाची पगडी घातली आहे. तर त्याच्या हातात कॉफी मग आहे. हा फोटो शेअर करत शेराने “थ्रोबैक फ्राइडे  #SalmanKhan #Sheraa #Beingsheraa #Antim” असे हॅशटॅग कॅप्शनला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Being Sheraa (@beingshera)

‘अंतिम’ या चित्रपटात सलमानचा मेहूणा आयुष शर्मासुद्धा मुख्य भूमिकेत आहे. या महिन्यात ‘अंतिम’चे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सलमान ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. सलमान खानने ‘राधे: तेरा मोस्ट वांटेड भाई’ चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी दिसणार आहेत. हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे.