सलमान खानसोबत झळकलेली अभिनेत्री झरीन खान ‘बिग बॉस’च्या या स्पर्धकाला करतेय डेट

या दोघा कपलमध्ये अभिनेता सलमान खानचं एक खास कनेक्शन आहे. सध्या हे कपल गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

zareen-khan-shivashish-mishra-1200

अभिनेत्री झरीन खान नेहमीच तिच्या खाजगी आयुष्यातील सर्व गोष्टी लपवत आली आहे. पण नुकतेच तिचे काही फोटोज समोर आले आहेत. समोर आलेल्या तिच्या या फोटोंनी तिची डेटिंग लाईफची पोलखोल केलीय. एकेकाळी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानसोबत झळकलेली अभिनेत्री झरीन खान ही सध्या सलमानच्याच रिअॅलिटी शोमधील स्पर्धक शिवशिष मिश्राला डेट करताना दिसून येतेय. सध्या हे कपल गोवामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. याचे काही फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत.

शिवाशिष मिश्रा हा सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉस 12 मध्ये झळकला होता. शिवाशिष मिश्राने नुकतंच त्याचा वाढदिवस साजरा केलाय. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ आणि फोटोज त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये झरीन खान ही शिवाशिषला ‘स्विटी’ म्हणून हाक मारताना दिसून आली.


शिवाशिषच्या वाढदिवशी अभिनेत्री झरीन खानने सुद्धा एक प्रेमळ पोस्ट शेअर केली होती. झरीनने शिवाशिषसोबतचा एक फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिली होती. यात तिने लिहिलंय, “‘टेढा है पर मेरा है, हॅपी बर्थ डे शिव….देवाची कृपा तुझ्यावर कायम राहो…तुझ्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होवोत…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Zareen Khan (@zareenkhan)


शिवाशिष आणि झरीन हे दोघेही सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. त्यांचे गोव्यातील फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यातील अफेअरबाबत चर्चांना सुरूवात केलीय. मात्र, अद्याप यावर दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या दोघांची क्यूट जोडी पाहून या दोघांनी लवकरात लवकर लग्न करावं, अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. यात एक युजरने लिहिलंय, “लग्न करून टाका…मुलगी चांगला आहे..”.

अभिनेत्री झरीन खान आणि शिवाशिष या दोघांमध्येही सलमान खानचं खास कनेक्शन आहे. झरीनने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. तर शिवाशिष सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस १२’ मधून त्याच्या करिअरची सुरूवात केलेली आहे. या दोघा कपलच्या जोडीला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. परंतू यातील कोणीही त्यांच्या रिलेशनशीपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khans heroine zareen khan bigg boss fame shivashish mishra dating vacation pics went viral prp

ताज्या बातम्या