समांथा रुथ प्रभूचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार मुख्य भूमिकेत

समांथा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण-७’ शोमध्ये हजेरी लावणार आहे.

समांथा रुथ प्रभूचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार मुख्य भूमिकेत

साउथ सुपरस्टार समांथा रुथ प्रभूचे देशभरात लाखो चाहते आहेत. तेलगू सिनेसृष्टीत समांथाने मोठी लोकप्रियता मिळवली. त्यानंतर मनोज वाजपेयीसोबत ‘फॅमिली मॅन २’ या हिंदी वेब सीरिजमधून तिने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली. तर आता समांथा लवकरच एका हिंदी सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

फिल्म ‘पुष्पा: द राइज’ सिनेमामधील आयटम सॉन्गमुळे समांथा चांगलीच चर्चेत आली होती. समांथा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर आता समांथाने बॉलिवूड सिनेमा साईन केल्याच्या चर्चा आहे. या सिनेमात ती अभिनेता आयुष्मान खुरानासोबत झळकेल असं वृत्त आहे.

समांथाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
बॉलिवूडमध्ये लवकरच समांथाची जादू पाहायला मिळणार आहे. दिनेश विजन निर्मित सिनेमात समांथा झळकणार असल्याचं म्हंटलं जातंय. असं असलं तरी फिल्म मेकर्स आणि समांथाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या वर्षाअखेरीस सिनेमाचं शूटींग सुरु होण्याची शक्यता आहे, तर २०२३ सालामध्ये सिनेमा रिलीज होईल.

दाक्षिणात्य सिनेमांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवल्यानंतर समांथा बॉलिवूडमध्ये तिचा करिश्मा दाखवण्यासाठी सज्ज झालीय. समांथाने एकच नव्हे तर दुसराही हिंदी सिनेमा साइन केलाय. हा सिनेमा करण जोहर प्रोड्यूस करणार असून अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.


समांथा आणि अक्षय कुमार लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सिझनमध्ये हजेरी लावणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हिरवागार निसर्ग अन् दाट धुक्यात रमली सई ताम्हणकर, भर पावसात जंगलामध्ये मनसोक्त भिजत राहिली अभिनेत्री
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी