दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा ‘यशोदा’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. तिच्या या थ्रिलर चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटासाठी तिने खूप मेहनत देखील घेतली आहे.अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामध्ये तिने ‘ऊ अंतावा’ या गाण्यावर डान्स केला होता. तेव्हापासून तिच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. तिने अनेक तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुपरहिट चित्रपटांसह तिचे खासगी आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे.

समांथा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती या माध्यमाद्वारे चाहत्यांसह खासगी आयुष्याबाबतची माहिती पोहोचवत असते. काही दिवसांपूर्वी तिने रुग्णालयामधला फोटो शेअर करत मोठा गौप्यस्फोट केला. या पोस्टद्वारे समांथाने तिला ‘मायोसायटिस’ नावाचा ऑटोइम्यून आजार झाला असल्याची माहिती दिली. चाहत्यांसह मनोरंजन जगतातील अनेक सेलिब्रिटींनी फोटोखाली कमेंट करत तिची विचारपूस केली होती.

आणखी वाचा – “तुम्हाला माझ्या हृदयात…”; वडिलांसाठी डान्सिंग क्वीन सपना चौधरीची भावूक पोस्ट

नुकतेच तिने आणखी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंना तिने “राज निदिमोरू या माझ्या जवळच्या मित्राचे दिवस कसाही असला आणि कितीही वाईट घटना घडल्या तरी मागे हटायचं नाही हे ब्रीदवाक्य मी आज एका दिवसापुरतं वापरत आहे”, असे कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये तिने सध्या ‘यशोदा’ चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचेही नमूद केले आहे. मायोसायटिस सारख्या गंभीर आजाराचा सामना करत असताना, ती चित्रपटासाठी त्रास सहन करत मेहनत घेत आहे. तिच्या न थांबण्याच्या वृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

आणखी वाचा – “बदनाम करायला एक क्षणही लागत नाही, पण…” मेघा घाडगेचे स्पष्ट शब्दात उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाचही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्मात्यांना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी आशा आहे. ‘यशोदा’नंतर तिचे ‘शंकुतलम’ आणि ‘खुशी’ हे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.