दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून समांथा ही तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. दरम्यान, आता समांथाने केलेल्या एका कृत्यामुळे ते दोघं पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

समांथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत घटस्फोटाची बातमी दिली होती. त्यांनी ही पोस्ट २ ऑक्टोबर २०२१ केली होती. दरम्यान, समांथाने आता ही पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डीलीट केली आहे. यामुळे आता समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.

आणखी वाचा : …म्हणून अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ बनली मराठी व्यक्तिरेखा; श्रेयस तळपदेन केला खुलासा

आणखी वाचा : ‘त्या’ दृश्यांवरून अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शिवाय समांथा गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील ‘ऊ अंतवा’ या गाण्यामुळे चर्चेत होती. हे तिचं पहिल आयटम सॉंग होतं. या गाण्यासाठी समांथाने ५ कोटी रुपये मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जाते. दरम्यान, समांथाच्या हातात आणखी बरेच प्रोजेक्ट्स आहेत. यात ‘Kaathu Vaakula Rendu Kaadhal’, ‘शाकुंतलम’, ‘यशोदा’ हे तामिळ चित्रपट आणि ‘अरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ या चित्रपटातून समांथा इंटरनेशनल डेब्यू करणार आहे.