गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा प्रभू ही चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. सध्या ती ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे प्रचंड चर्चेत आहे. यात तिच्या डान्सचे प्रचंड कौतुक केले जात आहे. नुकतंच मुंबईतील एका दुकानाबाहेर तिला स्पॉट करण्यात आले. मात्र यावेळी तिने परिधान केलेल्या टी-शर्टमुळे ती ट्रोल झाली आहे.
इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन समांथाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओ ती एका दुकानाबाहेर फोनवर बोलत असताना दिसत आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या टिशर्टवर “F*ck you, F**king you, F**k, असे लिहिण्यात आले आहे. समांथाने परिधान केलेला हे टीशर्ट टोर्न केलेला आहे. त्यावरुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर अनेकांनी तिच्या टी- शर्टवर लिहिलेल्या मजकूरावरुन तिला ट्रोल केले आहे.
‘हे टी-शर्ट घटस्फोट झाल्यानंतर घातल्यामुळे चांगले दिसत आहे’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘टी-शर्टला उंदराने कुरतडले का?’ असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला आहे. तर एका व्यक्तीने ‘मॅडमला कोणीतरी नवीन टी-शर्ट घेऊन द्या’, असे म्हटले आहे. ‘एका गाण्यासाठी ५ कोटी घेतले, तरी फाटलेले टीशर्ट घालून फिरते’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ‘एवढे पैसे आहेत तरीही फाटलेले शर्ट, असे एकाने म्हटले आहे. तर एकाने आमच्याकडे असे टीशर्टने लादी पुसतात’, अशी कमेंट केली आहे.

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे समांथाने पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. या गाण्यात ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे. या गाण्यासाठी समांथाने मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ हे गाणे केवळ ३ मिनिटांचे आहे. या आयटम साँगसाठी समांथाने १ किंवा २ कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर येत होती. मात्र या गाण्यासाठी तिने ५ कोटी रुपये मानधन आकारले आहे.