अभिनेता संजय दत्त लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तो मराठी चित्रपटात अभिनय नव्हे तर चित्रपटाची निर्मिती करत आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बाबा’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याने हा चित्रपट वडील सुनील दत्त यांना समर्पित केला आहे. संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बाबा’ हा चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या बाबांना हा चित्रपट समर्पित,’ असं ट्विट संजूबाबाने केलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी केले असून संजयने चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून येत आहे. भावनेला भाषा नसते अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. यात कोणकोणते कलाकार भूमिका साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

https://twitter.com/duttsanjay/status/1140868769692020736

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय दत्तच्या ‘बाबा’ चित्रपटाची कथा नेमकी काय असणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण पिता-पुत्राच्या नात्यावर हे चित्रपट भाष्य करणार हे शीर्षकावरूनच स्पष्ट होत आहे.  याआधी अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यांनी देखील मराठी चित्रपटाची निर्मिती केली.