दीड वर्षांत संजय दत्त चार महिने ‘बाहेर’

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त शिक्षेच्या दीड वर्षांच्या काळात संचित (पॅरोल) आणि अभिवाचन (फलरे) रजेवर सुमारे चार महिने (११८ दिवस) कारागृहाबाहेरच आहे.

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त शिक्षेच्या दीड वर्षांच्या काळात संचित (पॅरोल) आणि अभिवाचन (फलरे) रजेवर सुमारे चार महिने (११८ दिवस) कारागृहाबाहेरच आहे. आता पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याला फलरे रजा मंजूर झाली. मात्र रजा नियमाप्रमाणेच असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मंगळवारी चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर केली आहे. दत्तला न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यातील १८ महिने शिक्षा त्याने यापूर्वी भोगली आहे. २१ मे २०१३ पासून दत्त येरवडा कारागृहात आहे. या काळात त्याने स्वत:च्या पायाचे दुखणे, पत्नीचे आजारपण अशी कारणे देत रजा मिळवली. त्यात मुदतवाढ घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay dutt four time out of prison

ताज्या बातम्या