Son of Sardaar 2 Sanjay Sutt out Vindu Dara Singh Reveals Reason : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘सन ऑफ सरदार २’ सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाचा मजेदार ट्रेलर रिलीज झाला आहे, जो खूप पसंत केला जात आहे.
चाहते सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर खूप शेअर करत आहेत. ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर स्टारकास्टबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. कारण- यावेळी संजय दत्त चित्रपटात दिसत नाही.
दरम्यान, ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता विंदू दारा सिंह यांनी ‘झूम’शी झालेल्या संभाषणादरम्यान संजय दत्त या चित्रपटाचा भाग का होऊ शकत नाही हे सांगितले. तर जाणून घेऊ विंदू दारा सिंह यांनी त्यांच्या मुलाखतीत काय म्हटले आहे.
विंदू दारा सिंह यांना संजय दत्तची भूमिका मिळाली
अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण विंदू दारा सिंह यांनी ‘झूम’ला दिलेली मुलाखत आहे. विंदू दारा सिंह यांनी मुलाखतीदरम्यान खुलासा केला, “संजय दत्तची भूमिका अंतिम झाली होती; परंतु परदेशात शूटिंगसाठी त्याचा व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यानंतर संजय दत्त शूटिंगसाठी पोहोचू शकला नाही. या बातमीनं आमच्या सर्वांना दुःख झाले. संजय दत्त न आल्यानंतर निर्मात्यांना कथा बदलावी लागली आणि ती भूमिका माझ्या वाट्याला आली.” या खुलाशाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात संजय दत्त एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.
‘सन ऑफ सरदार २’मध्ये दिसणार हे कलाकार
‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात अजय देवगण आणि विंदू दारा सिंह यांच्याबरोबर मृणाल ठाकूर, रवी किशन, संजय मिश्रा, नीरू बाजवा हे कलाकारही दिसणार आहेत. अजय देवगणचा हा चित्रपट २५ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.