अस्स सासर सुरेख बाई या कलर्स वाहिनीवर मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानीस यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी संतोष जुवेकरने ही मालिका सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे तो आता मालिकेमध्ये परत येणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. अस्स सासर सुरेख बाईमध्ये यश कामानिमित्त राजस्थानला गेला होता. पण आता मालिकेमध्ये कामानिमित्त राजस्थानला गेलेला यश परतला आहे. कारण यशला एक गोड बातमी कळली आहे. ती बातमी ऐकून यशला परतण्याखेरीज काही पर्यायच उरलेला नाही. कारण त्याची बहिण रेखा आई होणार आहे. आणि ही बातमी कळताच त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

यशच्या बहिणीकडे रेखाकडे गुड न्यूज आहे हे कळताच काम झाल्या झाल्या यश महाजन घरी परत येणार आहे… त्याच्या स्वागताला अर्थातच यशच्या लाडक्या जुई मॅडम असतील, पण गंमत तर पुढे आहे… रेखाला सरप्राईझ द्यायचं म्हणून यश आणि जुई घर सजवतात. बाळांचे फोटो, फुगे, चित्र यामुळे चाळीतल्या दहा बाय दहाच्या घराचं रूप पालटतं.

जुई आणि यश उत्साहात सगळं घर सजवतात आणि घरच्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. रेखा तर भयंकर खुश होते. होणाऱ्या बाळाच्या मामा-मामींचा उत्साह बघून सगळे सुखावतात. यश-जुई गुड न्यूज कधी देणार याकडे मात्र साऱ्या महाजन कुटुंबाचं लक्ष लागलं आहे, हे वेगळ सांगायला नको !