बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सान्याचे लाखो चाहते आहेत. आपल्या कसदार अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सान्या यशस्वी ठरली. तिने दंगल चित्रपटातून सिनेसृष्टीच्या करिअरला सुरुवात केली. दंगल चित्रपटात आमिर खानसोबत झळकलेल्या सान्याने नुकतंच मुंबईत एक अलिशान घर खरेदी केले आहे. यामुळे ती बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची शेजारी बनली आहे. तिने नुकतंच सोशल मीडियावर घराचे काही फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

सान्या मल्होत्राने खरेदी केलेलं नवं घर हे मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर आहे. जुहूतील बे व्ह्यू बिल्डींगमध्ये तिने प्रशस्त फ्लॅट खरेदी केला आहे. ‘मनी कंट्रोल’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, तिने खरेदी केलेला हा फ्लॅट यापूर्वी समीर भोजवानी या व्यक्तीच्या नावावर होता. गेल्या १४ ऑक्टोबर २०२१ रोजी याबाबतचा संपूर्ण व्यवहार पूर्ण झाला आहे. यानंतर तिच्या नावावर हा फ्लॅट ट्रान्सफर झाला आहे.

सान्या मल्होत्रा आणि तिचे वडील सुनील कुमार मल्होत्रा यांनी या फ्लॅटसाठी ७१ लाख ५ हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. त्यांनी हा फ्लॅट १४.३ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे बोललं जात आहे. दरम्यान गेल्यावर्षी हृतिक रोशनने याच इमारतीत १०० कोटी रुपयांना दोन फ्लॅट खरेदी केले होते.

हृतिक रोशनने खरेदी केलेले हे प्लॅट १४, १५ आणि १६व्या मजल्यावर असून ३८ हजार स्क्वेअर फूट असल्याचे म्हटले जाते. या दोन फ्लॅटमधील एक फ्लॅट दोन मजल्यांचा असून एक पेंटहाऊस असल्याचे म्हटले जाते. हा फ्लॅट जुहू आणि वर्सोवा येथील लिंक रोडजवळ आहे. तसेच हृतिकच्या या नव्या फ्लॅटमधून समुद्र किनारा देखील दिसतो.

सान्या मल्होत्राने २०१८ मध्येही मुंबईत एक घर खरेदी केले होते. यावेळी ती म्हणाली होती, मुंबई आता माझे घर आहे. ते फार सुरक्षित आहे. त्यामुळे मला काळजी नाही, मला इथे खूप स्वातंत्र्य वाटते. माझे कुटुंब दिल्लीत राहते. ते अनेकदा मुंबईत येतात. गेली ५ वर्षे मी मुंबईत राहतेय आणि हे शहरही मला खूप काही देते. मी यापूर्वी सिंगल बेडरुमच्या अपार्टमेंटमध्ये राहायची. पण आता मोठं घर घेण्याचे कारण म्हणजे मला माझ्या कुटुंबासोबत राहता यावे, असे ती म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सान्याने ‘दंगल’ या चित्रपटात बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. या आधी सान्याने ‘लूडो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील सान्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर सान्याचा आयुषमान खुरानासोबत असलाला ‘बधाई हो’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.