“तिला माझ्यासोबत काम करणं आवडणार नाही कारण…”, सारा अली खानचा आई अमृता सिंहबद्दल खुलासा

या मुलाखतीत तिने आई अमृता सिंहसोबत काम करण्याबाबतचा खुलासा केला.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सारा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंह या दोघीही काही दिवसांपूर्वी एकत्र एका जाहिरातीत झळकल्या होत्या. मात्र अद्याप माय-लेकीच्या या जोडीने चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. नुकतंच साराने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आई अमृता सिंहसोबत काम करण्याबाबतचा खुलासा केला.

साराने नुकतंच डेकन क्रॉनिकल या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी साराला तुला आईसोबत चित्रपटात काम करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सारा म्हणाली की, “माझ्या आईला माझ्यासोबत काम करणे आवडणार नाही, कारण ती माझी ‘आई’ आहे. मला माझ्या आईसोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. पण माझी ही इच्छा क्वचितच पूर्ण होईल, असे मला वाटते. माझ्या मते आईला माझ्यासोबत काम करणे अजिबात आवडणार नाही.”

हेही वाचा : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीचं मोठं पाऊल

सारा पुढे म्हणाली की, “जर एखादा चित्रपट आम्ही केला, त्याचे शूटींग सुरु असेल आणि त्याचदरम्यान माझ्या चेहऱ्यावर केस आले तर ती मध्येच कट म्हणेल. त्यानंतर माझे केस व्यवस्थित करेल. मी आताही या गोष्टींची कल्पना करत आहे. कारण त्याठिकाणी मी तिची मुलगी असून मी सर्वोत्तम दिसावे, अशी तिची स्वाभाविक इच्छा असू शकते. त्यामुळे मला कधीही असं वाटतं नाही की मी तिला अशा परिस्थितीत टाकावे.”

“माझ्या आईच्या मते तुम्ही तुमच्या कामात १०० टक्के द्या. त्यामुळे तुम्हाला हवे ते परत मिळेल. ती आजही फार उत्साहाने कामावर जाते आणि कामावरुन परतत असतानाही ती तेवढीच उत्साहित असते. विशेष म्हणजे घरी परतल्यावर ती सांगते, मला फार मजा आली आणि मी फार छान काम केलं. आई असण्यापूर्वी ती एक अभिनेत्री होती. विशेष म्हणजे अजूनही ती एक उत्साही अभिनेत्री आहे.”

हेही वाचा : “मी फक्त ९ वर्षांची होते तेव्हाच…”, अमृता आणि सैफच्या घटस्फोटावर साराचा खुलासा

दरम्यान अमृता आणि सैफची ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. या चित्रपटातून सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होता. अमृता आणि सैफने घरातील लोकांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले. पण त्यानंतर फार काळ त्यांचा संसार टिकला नाही. अखेर २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफ २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसह विवाहबंधनात अडकला. करीना सैफ पेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan says her mother amrita would not like to work with her also reveals the reason nrp