scorecardresearch

करीना कपूरला ‘या’ कारणामुळे आई म्हणत नाही सारा अली खान

साराने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

करीना कपूरला ‘या’ कारणामुळे आई म्हणत नाही सारा अली खान
साराने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीनाशी लग्न करण्याआधी सैफचे अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. त्यांना दोन मुलं असून सारा अली खान आणि इब्राहम खान अशी त्याची नावं आहेत. तर, अशा वेळेस करीनाचं तिच्या सावत्र मुलांसोबत म्हणजेच सारा आणि इब्राहम यांच्याशी नातं जोडणं खूप महत्त्वाचं होतं. एका मुलाखतीत साराने तिच्यात आणि करीनात असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं होतं. एवढंच काय तर तिने करीनाला आई का बोलत नाही त्याच कारण देखील सांगितलं आहे.

सारा आणि सैफने दिग्दर्शक करणच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करणने साराला तिच्या आणि करीनाच्या नात्यावर प्रश्न विचारला. “करीनाला ती छोटी आई म्हणून हाक मारते का?” असा प्रश्न करणने साराला विचारला. त्यावर हसत सारा म्हणाली, “माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही करीना आमची दुसरी आई आहे असा दबाव टाकला नाही. यामुळे आम्हाला असं कधीच वाटलंच नाही की आम्ही करिनाला आई म्हणून हाक मारावी. मी करीनाला छोटी आई म्हणून हाक मारली तर करीनाला धक्का बसेल आणि ती म्हणेल हे काय? आणि छोटी आई बोलायंच नाही असं म्हणेल. तर मी करीनाला के किंवा करीना नावाने हाक मारते.”

आणखी वाचा : “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण…”, लतादीदींचा जुना व्हिडीओ व्हायरल

पुढे सारा म्हणाली, “आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. जेव्हा करीना माझ्याशी पहिल्यांदा बोलत होती, तेव्हा ती म्हणाली की, हे बघ तुझ्या आई खूप चांगली आहे. मला फक्त तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. तिने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी तिला छोटी आई वगैरे म्हणाली असती तर कदाचित ती स्वतःच माझ्यावर वैतागली असती.”

Photo : घरात दोनचं खुर्च्या? भारती सिंगचे आलिशान घर पाहिलेत का?

सैफ आणि करीनाने १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये लग्न केले होते. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर आहे. तर, दुसऱ्या नवाबचे नाव जहॉंगीर आहे. करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसणार आहे. तर सारा लवकरच विकी कौशलसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या आधी सारा अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या