बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच साराने सोशल मीडियावर जुन्या फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सारा ही तिच्या व्यस्त कामातून वेळात वेळ काढून फिरायला जाते. ती नेहमीच आपल्या मित्र-मैत्रीणीसोबत कुठे ना कुठे फिरायला जात असल्याचे व्हिडीओ शेअर करत असते. साराने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडीओत अनेक व्हिडीओ कट करुन एकत्र करण्यात आले आहे. यात ती कधी नदीच्या किनारी, तर कधी मेडिटेशन करताना दिसत आहे.
साराने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. यातील एका नेटकऱ्याने ‘लहानपणीचा आनंद’ अशी कमेंट केली आहे. तर ‘एकाने बाकी सर्व ठिक आहे, पण फिल्टरचा वापर कमी कर,’ अशी कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. साराचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकजण तिला विविध सल्लेही देताना दिसत आहे.
दरम्यान, सारा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुषही आहे. याशिवाय सारा ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात सारा विकी कौशलसोबत दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे आदित्य धर करणार आहेत. या आधी सारा ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसली होती. तर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.