Sara Khan Marries Second Time with Krish Pathak : टीव्ही अभिनेत्री सारा खानने ६ ऑक्टोबर रोजी तिचा बॉयफ्रेंड क्रिश पाठकशी लग्न केले. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. साराने ‘रामायण’ मालिकेतील ‘लक्ष्मण’ ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांचा मुलगा आणि अभिनेता-निर्माता क्रिश पाठकबरोबर विवाह केला आहे.
सारा खान आणि क्रिश पाठक यांनी कोर्ट मॅरेज केलं. सारा खानचे हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिने अली मर्चंटशी लग्न केलं होतं, पण ते नातं फक्त दोन महिनेच टिकलं होतं. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून सारा खानने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
साराची पोस्ट
कोर्ट मॅरेजनंतर डिसेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा होणार असल्याचेही तिनं सांगितलं आहे. क्रिश पाठक हा अनेक टीव्ही शोमध्ये दिसला आहे. साराने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि कॅप्शन दिले, “तू नेहमीच मला माझ्या आयुष्यात हवा होता. आता आपण एकत्र आहोत. डिसेंबरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न होईल.”
सारा खाननं बॉम्बे टाइम्सशी बोलताना तिच्या लग्नाबद्दल आणि नात्याबद्दल सांगितलं होतं. तिनं म्हटलं होतं की, “जेव्हापासून मी क्रिशबरोबर राहायला सुरुवात केली, तेव्हापासून मी स्वतःला त्याची पत्नी म्हणूनच स्वीकारलं आहे. कोर्ट मॅरेजचा अनुभव काहीतरी वेगळाच होता. माझ्यासाठी हा सुखद क्षण होता, पोटात फुलपाखरं उडत होती. ती भावना शब्दांत सांगणं कठीण आहे. क्रिशला मी नेहमी माझ्या आयुष्यातील जोडीदार म्हणून पाहिलं आहे. मला वाटतं की, जेव्हा तुम्ही संयम ठेवता तेव्हा तुम्हाला योग्य व्यक्ती नक्कीच भेटते.” सारानं असंही सांगितलं की, या नात्यात तिनं खूप काही शिकलं आहे. सारा आणि क्रिशची लव्हस्टोरी डेटिंग ॲपवरून सुरू झाली.
सारा खान ‘प्रीत से बंदी ये डोरी राम मिलाई जोडी’, ‘बिदाई’ आणि ‘ससुराल सिमर का’सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. तिने २०१० मध्ये ‘बिग बॉस ४’मध्ये अली मर्चंटशी लग्न केले होते, परंतु दोन महिन्यांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. क्रिश एक अभिनेता आहे आणि “POW – बंदी युद्ध”मध्ये दिसला आहे. तो ‘रामायण’मधील अभिनेता सुनील लाहिरी यांचा मुलगा आहे.