‘ससुराल सिमर का २’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत रीमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तान्या शर्माने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केल्यानंतर ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
तान्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. हे फोटो मालिकेच्या आगामी एपिसोडमधील होते. यात तान्या आत्महत्या करत असल्याचे दिसत होते. त्या सीनचे फोटो तान्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे पाहताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘असे फोटो शेअर करत तू लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेस.’ दुसरा म्हणाला, ‘तू वेडी आहेस का? तू अशा गोष्टी कशा पोस्ट करू शकतेस? आत्महत्या विनोद किंवा मनोरंजनाची गोष्ट नाही.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पुन्हा एकदा नाटकं सुरु झाली.’

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल
View this post on Instagram
आणखी वाचा : रॉबर्ट डाउनी ज्युनिअरनं माझ्या मेसेजची दखलही घेतली नाही – तापसी पन्नूची खंत
या कमेंट पाहिल्यानंतर तान्याने मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आत्महत्या करतानाच्या सीनचे चित्रीकरणाची तयारी सुरु आहे. तर या आधी शेअर केलेले फोटो तान्याने डिलीट केले. “माझ्या विषयी एवढी काळजी केल्याबद्दल धन्यवाद. पण मित्रांनो ते फोटो माझ्या मालिकेती आगामी एपिसोडमधले आहेत,” अशा आशयाचे कॅप्शन तान्याने दिले.