बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सध्या त्यांच्या जीवनावर आधारित ‘सच कहूं तो’ या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान त्यांनी अभिनेते सतीश कौशिक यांचा देखील उल्लेख पुस्तकात केला आहे.

नीना गुप्ता यांना मसाबा गुप्ता ही मुलगी आहे. मसाबा ही नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना गुप्ता यांनी विवियन रिचर्ड्सशी लग्न केले नव्हते. मसाबाच्या जन्माच्या वेळी नीना यांना अभिनेते सतीश कौशिक यांनी लग्नासाठी प्रपोज केले होते. नीना गुप्ता या प्रेग्नंट असतानाही सतीश कौशीक यांनी लग्नासाठी विचारले होते. पण नीना यांनी सतीश यांना नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

आणखी वाचा : …म्हणून ऐश्वर्याने करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाला दिला होता नकार

नीना गुप्ता आणि सतीश कौशिक यांनी ‘मंडी’ आणि ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांचे हे चित्रपट त्यावेळी हिट ठरले होते. मसाबाच्या जन्मानंतर नीना गुप्ता यांचे संपूर्ण आयुष्य बदलले होते. त्यांना अनेक निगेटीव्ह भूमिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यावेळी त्यांना खूप संघर्ष करावा लागल्याचे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीना गुप्ता यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘बधाई हो’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘पंचायच’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहे. तसेच नीना या ‘गुडबाय’ या चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना आणि परेश गुलाटी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.