बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘चलते चलते.’ या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबतच सतीश शाह, जॉनी लिव्हर आणि लिलेट दुबे या कालाकारांनी देखील भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १२ वर्षे उलटली आहेत. सतीश शाह यांनी या चित्रपटाशी संबंधीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.

नुकताच सतीश शाह यांनी ‘चलते चलते’ चित्रपटाशी संबंधीत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शाहरुखने त्यांना एक गोष्ट त्याची पत्नी गौरी खानपासून लपवण्यास सांगितले होते. ‘रेड चिली निर्मित चलते चलते चित्रपटासाठी मला ठरल्यापेक्षा जास्त मानधन मिळाले होते. मी शाहरुखला फोन करुन याबाबत माहिती दिली. तेव्हा शाहरुख म्हणाला होता सतीशभाई काही हरकत नाही पण ही गोष्ट गौरीला (शाहरुखची पत्नी) कळू देऊ नका’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘चलते चलते’ हा शाहरूख- राणीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटात सुरूवातीला ऐश्वर्या राय बच्चन प्रमुख भूमिकेत होती. चित्रपटाचं चित्रीकरणही ऐश्वर्यानं सुरू केलं होतं मात्र तडकाफडकी शाहरूखनं ऐश्वर्याला काढून राणीला महत्त्वाची भूमिका दिली. त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमानच्या अफेअरची चर्चा होती. सलमाननं मद्यपान करून ‘चलते चलते’च्या सेटवर धुमाकूळ घातला होता अशाही चर्चा त्यावेळी होत्या. या कारणामुळे वैतागून ऐश्वर्याला काढून राणी मुखर्जीला घेण्याचा निर्णय शाहरुखनं घेतला होता.