गुगल हे देशभरात सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची माहिती हवी असल्यास सर्वप्रथम कोणतीही व्यक्ती गुगलवर त्याबाबत सर्च करते आणि त्याबाबत अधिकची माहिती मिळवते. मात्र याच गुगलच्या सर्चमध्ये अनेकदा मोठमोठे गोंधळी होताना आपण पहिले आहेत. २०१६मध्ये गुगल सर्चनुसार पंतप्रधान मोदी यांना टॉप १० गुन्हेगारांच्या यादीत स्थान देण्यावरून गुगलला माफीनामा प्रसिद्ध करण्याची वेळ आली होती.

‘गुगल’वर जगातील टॉप गुन्हेगारांच्या यादीत मोदींच्या नावावरून कंपनीला नोटीस

त्यानंतर ‘गुगल’ या सर्वात मोठ्या सर्च इंजिनवर ‘Idiot’ हा शब्द टाकून प्रतिमा शोधल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमा समोर येत असल्याचा प्रकारही अगदी ताजा आहे.

‘Idiot’ टाईप केल्यानंतर गुगलवर दिसतेय ‘या’ नेत्याची प्रतिमा

अशा प्रकारचे गोंधळ गुगलच्या सर्चमध्ये होत असतानाच आता एक नवीन गोंधळ गुगलच्या सर्चमध्ये दिसून आला आहे. गुगलच्या सर्चमध्ये एक आक्षेपार्ह शब्द सर्च केल्यास त्याचा रिझल्ट म्हणून चक्क रणवीर सिंग या अभिनेत्याचे नाव दिसत आहे.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीर हा अत्यंत उत्साही आणि प्रतिभावान अभिनेता आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच तरुणींमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे. मधल्या काळात AIB Roast या कार्यक्रमामुळे त्याची प्रतिमा काही अंशी मलीन झाल्याचे दिसून आले. पण असे असले तरी त्याच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तशातच आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याशी तो लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सध्या अनेक सकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरला ही गोष्ट रुचणे शक्यच नाही. दरम्यान, यावर रणवीर काय प्रतिक्रिया देतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.