scorecardresearch

“मी त्याच्यावर नेहमीच प्रेम केलं…” जेव्हा सोहेल खानबद्दल बोलली होती सीमा सचदेवा

सीमा सचदेवा आणि सोहेल खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

seema sachdeva, sohail khan, seema sachdeva husband, sohail khan seema sachdeva sepration, sohail khan wife, सोहेल खान, सीमा सचदेवा, सोहेल खान पत्नी, सोहेल सीमा विभक्त, सोहेल खान घटस्फोट
मागच्या काही काळापासून हे दोघंही वेगवेगळे राहत असल्याचंही बोललं जातं.

सीमा सचदेवा आणि सोहेल खान यांनी लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. मागच्या काही काळापासून हे दोघंही वेगवेगळे राहत असल्याचंही बोललं जातं. तसेच त्यांची मुलं योहान आणि निर्वाण आपल्या आईवडिलांच्या घरी येत जात असतात अशीही चर्चा आहे. दरम्यान सीमा खाननं ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ शोच्या एका एपिसोडमध्ये सोहेल खानसोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितलं होतं.

सीमा खानने नेटफ्लिक्सच्या ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ शोमध्ये बोलताना तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलाताना सोहेलसोबतच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती, “मी त्याच्यावर प्रेम करते आणि नेहमीच करत राहणार आहे. आमचं नातं खूपच चांगलं होतं. फक्त एवढंच की कधी कधी तुम्ही मोठे होता तेव्हा तुमची नाती वेगळी होतात आणि तुम्ही वेगवेगळ्या दिशांना निघून जाता. आम्ही एका युनिटप्रमाणे आहोत. आमची मुलं खूश आहेत. आमच्यासाठी ही एकच गोष्ट खूप महत्त्वाची आहे.”

आणखी वाचा- बॉलिवूड कलाकारांवर संतापले ‘आश्रम 3’ चे दिग्दर्शक, म्हणाले “मला त्यांची चीड येते…”

सोहेल सीमाला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला होता. अभिनेता चंकी पांडेच्या लग्नात सोहेल आणि सीमा यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या आणि मग दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र सीमाचे कुटुंबीय या दोघांच्या विरोधात होते कारण दोघांचेही धर्म वेगवेगळे होते. पण दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन १९९८ साली लग्न केलं होतं.

दरम्यान अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटानंतर आता सोहेल खान आणि सीमा सचदेवा यांचा घटस्फोट होणं हा खान कुटुंबीयांसाठी मोठा धक्का आहे. सलमान खाननं हे नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्याला त्यात यश आलं नाही असं बोललं जातं. सोहेल खानचं नाव हुमा कुरैशीसोबत जोडलं गेल्यानंतर सीमा- सोहेलच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जातं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Seema sachdeva talk about husband sohail khan says i will always love him mrj

ताज्या बातम्या