अभिनेता सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही मे महिन्यात न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटासाठी अर्ज करण्याआधीच्या काही काळापासून हे दोघंही वेगवेगळे राहत असल्याचंही म्हटलं जात होतं. नुकतेच तिने सोहेलशी घटस्फोट घेण्यामागचं कारणही सांगितलं होतं. आता तिने त्यासंबधित आणखी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘फॅब्युलस लाईफ्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स 2’मध्ये तिने हजेरी लावली होती. यावेळी सोहेल खानशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने आपल्या नावातून ‘खान’ आडनाव वागळण्याचा घेतलेला निर्णय त्यांचा मोठा मुलगा निर्वाणला खटकल्याचं स्पष्ट केलं. आईच्या या निर्णयाच्या तो विरोधात होता.

आणखी वाचा : निर्मात्यांचे नुकसान भरून काढणार विजय देवरकोंडा, ‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशानंतर घेतला मोठा निर्णय

सीमा सजदेह-सोहेल खानचा मुलगा निर्वाण सीमाला म्हणाला, “आपण चौघं कुटुंब आहोत,खान कुटुंब. पण तू ‘खान’ आडनाव काढून आपल्या तिघांची नावं ठेवलीस. तुला त्या एका व्यक्तीला आपल्या आयुष्यातून काढायचं होतं आणि ज्याची मुळीच गरज नव्हती. त्याने काय फरक पडला? शेवटी आपण खानच आहोत आणि आपण खानच राहणार.”

सीमा पुढे म्हणाली, “जेव्हा निर्वाणने मला विचारलं की तू ‘खान’ आडनाव नेमप्लेट वरून का काढलंस? तेव्हा मी त्याला म्हटलं, मी आता ते आडनाव कसं वापरू शकते? म्हणून मी फक्त आपल्या तिघांची नावं तिथं लिहिली. मला मान्य आहे आपण कुटुंब आहोत. पण तरीही आता माझ्या आयुष्यात मी पुढे निघून गेले आहे. जे गरजेचं होतं. सध्याच्या परिस्थितीत मी कुणीच नाही. ना सजदेह, ना खान. पण तू आणि तुझा धाकटा भाऊ योहानसोबत खान नाव कायम राहिल, जे माझ्यासोबत राहणार नाही. मला आता माझ्या नावापुढे कोणत्याच आडनावाची गरज भासत नाही.”

हेही वाचा : “माझ्या आयुष्यात…”; सीमा सचदेवाने पहिल्यांदा सांगितलं सोहेल खानपासून विभक्त होण्याचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोहेल खान आणि सीमा सजदेह यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. तब्बल २४ वर्षाचा संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मे २०२२ मध्ये सोहेल खान आणि सीमा सजदेहने कोर्टात घटस्फोटाची केस फाइल केली.