बॉलीवूड कलाकार आलिया भट आणि वरूण धवनने त्यांच्या आगामी रोमॅण्टिक कॉमेडी ‘हंम्प्टी शर्मा की दुल्हनिया’चा पोस्टर प्रदर्शित केला आहे. २५मे रोजी हा पोस्टर आयपीएलच्या एक्स्ट्रा इनिंग कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला.
चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये आलिया आणि वरूण सेल्फीसाठी पोज देताना दिसतात. हा पोस्टर आपलीच आयडिया असल्याची एकही संधी आलियाने दवडली नाही. चित्रपटाची कथा हंम्प्टी (वरूण धवन) आणि काव्या (आलिया भट) यांच्यावर आधारित आहे. हे दोघे एकमेकांना दिल्लीत भेटतात आणि त्यानंतर पंजाबमध्ये त्यांच्या प्रेमास सुरुवात होते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध ट्रेण्डमध्ये असलेल्या म्हणजेच सेल्फी आणि वॉट्सअपचा वापर केला जात आहे.
चित्रपटाच्या पहिल्या टीझर प्रोमोमध्ये वरून धवन खूप उत्सुकतेने स्वतःसाठी बायको शोधताना दिसतो. पण, हंम्प्टी शर्माच्या आकाशाऐवढ्या अपेक्षा असतात. त्याची भावी पत्नी दीपिकी पादुकोण आणि कतरिना कैफसारखी हवी अशा त्याची अपेक्षा असते. याउप्पर, हंम्प्टी वॉट्सअॅपवर रिक्वेस्टही पाठवतो. जेणेकरून त्या मुलींना आपण आवडलो तर त्या आपल्याला अॅड करतील.
करण जोहची निर्मिती असलेला हा चित्रपट ११ जुलैला प्रदर्शित होणार आहे.