September OTT Release : सप्टेंबर महिन्यात ओटीटीवर अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. हा महिना तुमच्यासाठी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन येत आहे. या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅक्शन, कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा अशा अनेक उत्तम गोष्टी प्रदर्शित होणार आहेत. कोणते पाच बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, कधी आणि कुठे? जाणून घेऊयात.
सैयारा
मोहित सुरी दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित, ‘सैयारा’ हा एक म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि २०२५ मध्ये तो आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, तुम्हाला तो १२ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
मालिक
पुलकित दिग्दर्शित आणि कुमार तौरानी आणि जय शेवक्रमणी निर्मित या अॅक्शन थ्रिलरमध्ये राजकुमार राव, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला थिएटरमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु स्ट्रीमिंगवर अधिक प्रेक्षक मिळतील अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.
आँखों की गुस्ताखियाँ
झी स्टुडिओज आणि मिनी फिल्म्स निर्मित, मानसी बागला लिखित आणि संतोष सिंग दिग्दर्शित, या रोमँटिक ड्रामा चित्रपटातून शनाया कपूरने विक्रांत मॅसीबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि आता तो ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी झी५ वर प्रदर्शित होणार आहे.
इन्स्पेक्टर झेंडे
इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयी इन्स्पेक्टर ‘मधुकर झेंडे’ची भूमिका साकारत आहेत, तर जिम सर्भ ‘कार्ल भोजराज’ची भूमिका साकारत आहेत, जे कुप्रसिद्ध सीरियल किलर चार्ल्स शोभराजपासून प्रेरित आहे. जय शेवक्रमणी आणि ओम राऊत निर्मित हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
कुली
लोकेश कनागराज लिखित आणि दिग्दर्शित, अॅक्शन थ्रिलर कुलीमध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहीर, सत्यराज, उपेंद्र आणि रचिता राम यांच्याही भूमिका आहेत. आमिर खान आणि पूजा हेगडे यांनी चित्रपटात कॅमिओ केले आहेत. हा चित्रपट आता ११ सप्टेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.