ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाइन फ्लू झाला आहे. मुंबईतील एका रुग्णालयात त्या उपचार घेत असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समजत आहे.

सर्दी- खोकला झाल्याने रुटीन चेकअपसाठी त्या डॉक्टरांकडे उपचारांसाठी गेल्या होत्या वेळी त्यांना स्वाइन फ्लूचे निदान झाले. ‘आता माझी प्रकृती सुधारत आहे’ अशी माहिती त्यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिली. ‘मला फार क्वचीतच आराम करण्यासाठी वेळ मिळतो आता मी आराम करणार, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणार. याकडे केवळ आजारपण म्हणून न पाहता  स्वत:ला मिळालेला ब्रेक म्हणून पाहणार आहे असंही त्या म्हणाल्या.

शबाना आझमी यांनी नुकतीच जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला उपस्थिती लावली होती.