बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची जोडी आणि अभिनेत्री काजोलची जोडी ही बॉलिवूड चित्रपटांमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांचे चित्रपट नेहमीच सुपरहिट ठरले आहेत. या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र एकवेळ अशी होती जेव्हा शाहरुखचा धाकटा मुलगा अबरामला एकेकाळी काजोल आवडत नव्हती.
‘दिलवाले’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी शाहरुखने या विषयी सांगितले होते. यावेळी शाहरुखचा मोठा मुलगा आर्यनला त्याची आणि काजोलची जोडी कशी वाटते. दिवसभरात चित्रपटाचे किती आणि काय काय चित्रीकरण केले हे दिग्दर्शक रोहित शेट्टी चित्रीकरण संपल्यावर दाखवतात. एक सीन होता जिथे शाहरुख जखमी झाला होता. ते पाहिल्यानंतर अबरामला वाटलं की हे काजोलमुळे झालं आहे, असे शाहरूख म्हणाला.
View this post on Instagram
आणखी वाचा : BB OTT : ‘मला मुल पाहिजे पण…’, शमिताने राकेशला सांगितली तिच्या मनातली इच्छा
पुढे शाहरूख म्हणाला, ‘अरबाजने जेव्हा काजोलला पाहिले तेव्हा तो तिला म्हणाला ‘बाबा तुटून गेले. शाहरुखचा खलनायकासोबत सीन असेल तर अबरामला एवढी भीती वाटत नव्हती जेवढी काजोलसोबत माझा सीन असेल तेव्हा असायची. आम्ही दोघांनी एकत्र काम केलेल अबरामला आवडत नव्हते.’
आणखी वाचा : अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ आता काय करतात?
शाहरुख आणि काजोलने सगळ्यात शेवटी ‘दिलवाले’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील ‘गेरुआ’ हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं. सध्या शाहरूख ‘पठान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरूख दीपिका पदुकोनसोबत दिसणार आहे. तर जॉन अब्राहम देखील या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख आणि जॉन पहिल्यांदा मोठ्या सक्रिनवर दिसणार आहेत.