‘फॅन’ची पाकिस्तानवासियांवर जादू, विक्रमी कमाई

भारतातही या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली

फॅन, shah rukh khan, शाहरुख खान
'फॅन'मधील शाहरूख खानचे एक लूक

अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित ‘फॅन’ने भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही लक्षवेधक कमाई केली आहे. विशेषतः कराची आणि लाहोरमध्ये प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावरच घेतल्यासारखे चित्र आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतच ‘फॅन’ने पाच कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉलिवूडमधील एखाद्या चित्रपटाने पाकिस्तानात पहिल्या तीन दिवसांत इतकी कमाई करण्याची ही पहिलीच वेळ असून, ‘फॅन’ने नवे रेकॉर्डच तयार केले.
या चित्रपटाचे पाकिस्तानमधील वितरणाचे हक्क जिओ फिल्म्सकडे आहेत. याच कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या तीन दिवसांत ‘फॅन’ने ५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. कराची आणि लाहोरमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद सर्वाधिक असून, अनेकांची चित्रपट पाहिल्यावर त्याचे कौतुक केले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे पुढील आठवड्याभराचे अॅडव्हान्स बुकींगही पूर्ण झाले आहे. या दोन्ही शहरांमधील मल्टिप्लेक्स आणि एक पडदा चित्रपटगृहातील बहुसंख्य तिकीटे अगोदरच विकली गेली आहेत.
भारतातही या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘फॅन’मध्ये शाहरूख खानने डबल रोल साकारला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shah rukh khans fan sets new record in pakistan