बॉलीवूड बादशहा शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्याशी संवाद साधण्याची संधी चालून आली आहे. #fame वर तुम्ही शाहरुखशी व्हिडिओद्वारे थेट संवाद साधू शकणार आहात. या व्हिडिओ संवादाद्वारे तुम्ही शाहरुखला प्रश्न विचारू शकणार आहात. तसेच, त्याच्या आयुष्यातील आणि कामातील काही रंजक गोष्टीही तुम्हाला माहिती करुन घेता येणार आहेत.
जगभरातील लोकांकडून मला प्रेम आणि जिव्हाळा मिळाला आहे त्याबद्दल मी स्वतःला नशिबवान समजतो. त्यांना मी माझे नुसते चाहते म्हणून नाही संबोधू शकत. ही ती लोक आहेत ज्यांच्याकडून मला नेहमी प्रेम मिळते, ते नेहमी माझ्याशी पाठीशी उभे असतात आणि या प्रेमाची परतफेड करण्याची संधी मी नेहमीच शोधत असतो. सोशल मिडिया या सर्वांशी एकाच वेळी संवाद साधण्याचे एक चांगले माध्यम आहे. #fame ने ही संधी उपलब्ध करून दिली असून मी तुमच्याशी थेट संवाद साधू शकेन. त्यामुळे तुम्हा सर्वांना आमंत्रण देताना मला फार आनंद होतोय. तुम्ही मला iamsrk नावाने #fame वर फॉलो करा, असे शाहरुखने म्हटले आहे. फेमवर शाहरुखला फॉलो करून त्याच्यासी व्हिडिओद्वारे लाइव्ह संवाद साधता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2016 रोजी प्रकाशित
शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्याशी थेट संवाद साधण्याची संधी!
त्याच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टीही तुम्हाला माहिती करुन घेता येणार आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 22-01-2016 at 13:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khans fans can interact with him on live video social platform