‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला टीव्ही अभिनेता शाहीर शेखचे लाखो चाहते आहेत. आजवर त्याने वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या शाहीर त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. शाहीर आणि त्याची पत्नी रुचिकाच्या घरी लवकरच एक पाहूणा येणार आहे.
शाहीर शेख सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही. तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना ही कधी दिसला नाही. त्याला ते आवडत नाही असेही त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. पण काही दिवसांपासून शाहीर शेख सोशल मीडियावर बरेच फोटो पोस्ट करताना दिसत आहे. शाहीरने कुटुंबातील सदस्यांबरोबर एक फोटो पोस्ट केला असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या फोटोत शाहीर त्याच्या कुटुंबियांसह दिसत आहे. शाहीरने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमध्ये शाहीरची पत्नी आणि प्रोड्यूसर रूचिकाची ‘बेबी बंप’ दिसत आहे. या पोस्टवर शाहीरने “आनंद घरातच असतो”असे गोड कॅप्शनही दिली. शाहीरच्या या पोस्टवर लाखो लाइक्ससह कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
View this post on Instagram
शाहीर शेख आणि रूचिका कपूर यांचे लग्न गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाले होते. या दोघांची भेट ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या दरम्यान झाली होती. एका कॉमन फ्रेंडमुळे ते जवळ आले. पहिल्याच भेटीत दोघांनी एकमेकांना पसंत केले. सुरूवातीला या दोघांची मैत्री झाली आणि काही दिवसांनतर कोर्ट मॅरेज करून ते दोघेही विवाहबंधनात अडकले. रूचिका कपूर बद्दल सांगायचे झाले तर ती बालाजी टेलिफिल्ममध्ये सिनिअर व्हाईस प्रेसिडंट आहे. खूप काळ एकमेकांना डेट केल्यानंतर शाहीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यांच्यातील नात्याबाबत जाहीर केलं होते. जवळजवळ दीड वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते.
दरम्यान शाहीर शेख आणि एरिकाची ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ तिसरे पर्व १२ जुलै रोजी सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram