अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मिरा बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत असते. मिरा सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळे फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. यंदा मात्र मिराने स्वत:चा फोटो शेअर न करता आपल्या लाडक्या लेकीचा फोटो शेअर केलाय. शाहिद आणि मिराच्या मुलीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

शाहिद आणि मिराच्या धाकट्या मुलीचा म्हणजेच मिशाचा नुकताच पाचवा वाढदिवस पार पडला. २६ ऑगस्टला मिशा ५ वर्षांची झाली. यानंतर मिराने आपल्या लेकीच्या वाढदिवसाचे खास फोटो तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केले आहेत. यात मिराने बर्थडे केकचा एक फोटो शेअर केलाय. तर बर्थडे साठी तयार झालेल्या मिशाचा दुसरा फोटो तिने शेअर केला. या फोटोत मिशा खूपच मोठी झालेली दिसतेय. तिने सलवार सूट परिधान केलं असून गॉगल घातला आहे. मिशाने मोठ्या स्टाइलमध्ये फोटोसाठी पोज दिलीय. मिशाचा हा स्टायलिश अंदाज सध्या व्हायरल होतोय.

हे देखील वाचा: “इथे तुझ्यासारखा कुणीही नाही”, फराह आणि शाहरुख खानच्या धमाल व्हिडीओची सोशल मीडियावर धूम

shahid-mira-daughter
(Photo-Instagram@mira.kapoor)

हे देखील वाचा: ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये ‘तो’ शब्द उच्चारताना अमिताभ बच्चन यांची देखील बोबडी वळली

हा फोटो शेअर करत मिराने “हॅपी बर्थडे माय लिट्ल स्टार” असं कॅप्शन दिलंय.त्याचसोबत मिराने मिशाच्या बर्थडे केकचा देखील एक फोटो शेअर केलाय. यात इंद्रधनुष्याच्या रंगाचा केक मिशासाठी तयार करण्यात आल्याचं दिसतं. या फोटोवर कॅप्शन देत मिराने लिहिलं “तू जन्माला आल्यानंतर आम्ही आयुष्यात रंगांसोबत खेळू लागलो. माझ्या प्रिय मिशा. चमकत रहा, आनंदी रहा. आकाशातील ताऱ्यांला आणि इंद्रधनुष्याला गवसणी घाल.” अशा आशयाची सुंदर पोस्ट मिराने लेकीसाठी लिहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहिद आणि मिरा अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात