बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. अभिनय आणि कामासोबतच शाहिद कामयचं कुटुंबाला प्राधान्य देणं पसंत करतो. अनेकदा शाहिदला पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत वेळ घावताना पाहायला मिळतं. नुकतच शाहिद आणि मीराला दोन्ही मुलांसोबत एअर पोर्टवर स्पॉट करण्यात आलंय. मात्र या वेळी शाहिद कपूरने परिधान केलेल्या जॅकेटमुळे काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय.
यावेळी शाहिदने मुलगा झैनला उचलून घेतलं होतं. तर मुलगी मिशा मीरासोबत चालली होती. यावेळी शाहिद फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना हाताने खुणावून अंतर ठेवायला सांगत असल्याचं पाहायला मिळतंय. तसचं शाहिदने यावेळी शार्टस् आणि टी-शर्टवर जॅकेट परिधान केलं असून या जॅकेटवर पाठिमागे ‘नो फोटोग्राफी’ असं लिहिलं असल्याचं दिसून येतंय. शाहिदच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी शाहिदची मोठी झालेली मुलं पाहून आश्चर्य व्यक्त केलंय. तर अनेकांनी मात्र त्याच्या ‘नो फोटोग्राफी’ लिहिलेल्या जॅकेटवर कमेंट करत त्याला ट्रोल केलंय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने शाहिदचा हा व्हि़डीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.
…आणि पडता पडता वाचली सुष्मिता सेन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
“आमिर सारखं तुझं लग्नही टिकणार नाही”, नेटकऱ्याच्या कमेंटवर रिचा चड्ढा भडकली
हा व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी शाहिदला खूपच गर्व असल्याचं म्हंटलंय. तर एक नेटकरी म्हणाला, “स्वत: फोटोग्राफर्सना बोलवता की या आमचे फोटो काढा, आम्ही एअरपोर्टवर तयार होवून आलो आहोत आणि नंतर स्वत:च ड्रामा करतात.” तर दुसरा युजर म्हणाला, “त्याचं नो फोटोग्राफी हुडी आवडलं. पण मग त्याच्या पीआर टीमने फोटोग्राफर्सना कशाला बोलावलं. दुट्टपी स्वभाव”

शाहिदच्या या व्हिडीओवर आणखी एक नेटकऱी म्हणाला, “याचा जर्सी सिनेम रिलीज होऊ द्या. पहा मग फोटोग्राफर्सना नो फोटो म्हणतोय का? गर्विष्ठ” अशा आशयाची कमेंट करत नेटकऱ्याने संताप व्यक्त केलाय.
दरम्यान ,शाहिद लवकरच राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या आगामी वेब सीरिजद्वारे डिजिटल पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.तसचं शाहिद ‘जर्सी’ या सिनेमातूनही झळकणार आहे.