“आमिर सारखं तुझं लग्नही टिकणार नाही”, नेटकऱ्याच्या कमेंटवर रिचा चड्ढा भडकली

रिचा आणि अली लवकरच लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.

ali-fazal-richa-chadha-

बॉलिवूड अभिनत्री रिचा चड्ढा आणि अली फजल गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. रिचा आणि अली लवकरच लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. दरम्यान अली आणि रिचाच्या लग्नाच्या चर्चांनंतर ट्विटरवर एका नेटकऱ्यांने रिचाला विचित्र प्रश्न विचारला यावर रिचाने या नेटकऱ्याची बोलती बंद केलीय.

ट्विटरवरील एका युजरने रिचाला एक प्रश्न विचारला. “तुझा घटस्फोट कधी होणार आहे सांग? कारण तुझं लग्न आमिर खान सारखं जास्त दिवस टिकणार नाही.” असं युजर रिचाला म्हणाला. सोशल मीडियावर कायमच ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या रिचाने या नेटकऱ्याची देखील बोलती बंद केली.

सर्वेश नावाच्या युजरला रिचा म्हणाली, “माझं जाऊ दे…तुझ्या सारख्या भिकाऱ्याशी कुणीही स्वखुशीने लग्न केलं नाही म्हणून अस्वस्थ झाला आहेस का? तुझ्या केसमध्ये हुंडा तर मुलीने मागितला असले. रुप नाही, अक्कल नाही आणि गरीब?, आईला गॅसवरून चुलीवर स्वंयंपाक करण्याची वेळ आली असेल. काकू तुम्हाला नमस्कार, मात्र अशा तुम्ही अशा सैतानरुपी पुत्राला या जगात का आणलं? हा बेरोजगार फक्त सोशल मीडियावर आपलं तोंड उघडण्याचं धाडस करू शकतो.” अशा आशयाचं ट्वीट रिचाने केलं आहे.

(Photo-Twitter@theRichaChadha)

सोशल मीडियावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत त्यांनी बोलती बंद करण्याची रिचाची ही काही पहिली वेळ नव्हे. अनेकदा रिचा तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत असते. तसचं विविध मुद्द्यांवर तिचं स्पष्ट मत मांडत असते.

२०२० सालामध्ये रिचा आणि अलीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र करोनाच्या संकटामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे त्यांनी लग्नाचा निर्णय पुढे ढकलला. तर काही दिवसांनी अलीच्या आईचं निधन झाल्याने त्यांचं लग्न होवू शकलं नाही.

२०१२ सालामध्ये आलेल्या ‘फुकरे’ सिनेमाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिल्यांदा ओळख झाली होती. तर २०१५ सालापासूने त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. तर २०१७ सालामध्ये त्यांनी जाहीरपणे नात्याची कबुली दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Richa chadha slam user who said her marriage with ali fazal will end up like aamir khan kpw

ताज्या बातम्या