बॉलीवूडमधील नवा बाबा म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे त्यांच्या मुलीला घेऊन अमृतसरला गेले आहेत. आपल्या मुलीला गुरुजींचा आशिर्वाद मिळावा म्हणून हे दोघेही त्यांच्या चिमुकलीला घेऊन अमृतसरला रवाना झाले. इतकेच नाही तर मुलीचे नाव काय ठेवावे याविषयी देखील ते गुरुजींशी चर्चा करणार असल्याचे कळते. अद्यापपर्यंत शाहिद आणि मीराने त्यांच्या मुलीचे नाव ठरविलेले नाही. त्याचकरिता शाहिदचे वडिल आणि अभिनेता पंकज कपूर त्याला आणि मीराला अमृतसरला घेऊन गेल्याचे कळते.
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी २६ ऑगस्टला एका परिराणीने जन्म घेतला. मीराने २६ ऑगस्टला रात्री ८ दरम्यान मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्या बाळाला जन्म दिला. यावेळी स्वतः शाहिद, त्याचे वडिल पंकज कपूर आणि आई सुप्रिया पाठक रुग्णालयात उपस्थित होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिदच्या मुलीचे वजन २.८ किलोग्रॅम असून नैसर्गिक प्रसूतीद्वारे तिचा जन्म झाला. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर शाहिद आणि मीराचा आनंद गगनात मावत नव्हता. आपला हा आनंद त्यांनी सोशल मिडीयाद्वारे व्यक्त केला होता.
मीरा राजपूतची डिलीव्हरी डॉ. किरण कोएलो यांच्या देखरेखीत करण्यात आली होती. अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माची डिलीव्हरीदेखील डॉ. किरण यांनीच केली होती. काही दिवसांपूर्वीच मीराला खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात मीराचे बाळंतपण होईल असे आधी म्हटले जात होते. पण शाहिदने ऑगस्टमध्येच सर्वांना गोड बातमी दिली. दरम्यान, उडता पंजाबच्या प्रदर्शनानंतर आपल्या पत्नीची योग्य देखरेख व्हावी म्हणून शाहिदने कामातून सुट्टी घेतली आहे.

Nothing like the wife’s hair band to manage messy hair. #quickfix

A photo posted by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

Tommy prep. Delta death.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A video posted by Shahid Kapoor (@shahidkapoor) on