बॉलिवूडचा हॉट स्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत नुकतीच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोला गेली होती. या शोदरम्यान, नेहाने तिला अनेक प्रश्न विचारले. बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये अशी कोणती अभिनेत्री आहे जिने स्वतःचा ड्रेसिंग सेन्स बदलणे गरजेचे आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना मीराने एका क्षणात विद्या बालनचे नाव घेतले. मीराच्या या उत्तरावर अनेकजण नाराज झाले आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरूवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्या ही शाहिदची तथाकथित प्रेयसी असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे शाहिदच्या पुर्वाश्रमिच्या प्रेयसीवर मीरा जळते असेच अनेक ट्विटरकरांनी लिहायला सुरूवात केली. २००८ मध्ये आलेल्या ‘किस्मत कनेक्शन’ या सिनेमात विद्या आणि शाहिदने एकत्र काम केले होते. यानंतरच दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या कारणामुळेच मीराच्या निशाण्यावर विद्या असल्याचे विद्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. शाहिद आणि मीरा जूहुच्या त्याच इमारतीत राहतात ज्या इमारतीत विद्या आणि तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर राहतात.

काही दिवसांपूर्वी शाहिदही एका पेपरच्या कात्रणामुळे ट्रोल झाला होता. या कात्रणात लिहिले की, मी जेव्हा १८ वर्षांचा होतो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी जिच्याशी लग्न करणार आहे ती यावेळी ५ वर्षांची आहे. ही माझ्या आयुष्यातील हास्यास्पद घटना होती. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor wife mira kapoor suggest for vidya balan for change a stylist shahid kapoor vidya balan fans trolled mira rajput
First published on: 28-12-2017 at 19:50 IST