अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर ही कायम चर्चेत येत असते. मीराची लोकप्रियता ही एका अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीत एका क्यूट कपलच्या लिस्टमध्ये मीरा आणि शाहिदच्या जोडीचं नाव घेतलं जातं. मीरा तिच्या फिटनेसबाबतील नेहमीच अलर्ट राहत असते. ती तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय देखील असते. सोशल मीडियावर अकाउंटवर हॉट फोटोज आणि व्हिडीओजसोबतच ती वर्कआऊट करतानाचे फोटोज आणि व्हिडीओज देखील शेअर करत असते. अशातच तिचा एक नवा वर्कआऊट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

मीरा राजपूतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा हा वर्कआऊट व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती एका आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम करताना दिसून येतेय. मीरा स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेतेय हे या व्हिडीओमधून दिसून येतंय. ती लटकत असलेल्या झाडाला आंबे मोठ्या प्रमाणात दिसून आले. याच झाडाखाली एका टेबलवर खाण्याचे पदार्थ देखील ठेवण्यात आल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “काहीतरी नवं केलं आहे…कारणे चालणार नाहीत… ”

हा व्हिडीओ शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना एक धडा दिला आहे. परिस्थिती कोणतीही असो, पण फिटनेस खूपच महत्त्वाचा आहे, असं तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. मीरा राजपूतच्या या व्हिडीओला तिच्या फॅन्सनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. अनेक फॅन्सनी तर या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचं कौतूक देखील केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मीरा राजपूतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिच्या मुलांनी तिच्यासाठी सॅलेड बनवल्याचं तिने या स्टोरीतून सांगितलं होतं. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “माझ्या मुलांनी माझ्यासाठी सॅलेड बनवलं आणि मला खाऊ देखील घातलं.. “. यासोबतच तिने इमोजी देखील शेअर केल्या होत्या.