आजपर्यंत शाहरुख खानने अनेक हिट सिनेमे केले. रोमँटिक, अ‍ॅक्शन आणि कॉमेडी सर्व प्रकारच्या सिनेमांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या. २०१८ च्या ‘झिरो’ चित्रपटानंतर शाहरुख खान बराच काळ चित्रपटांपासून दूर राहिला आणि चार वर्षे पूर्ण केल्यानंतर तो २०२३ मध्ये ‘पठाण’ चित्रपटात दिसला.

यानंतर त्याचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि तोही ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानंतर तो ‘डंकी’मध्येही दिसला. आता शाहरुख पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये अ‍ॅक्टिव्ह झाला आहे, पण जेव्हा तो ब्रेकवर होता तेव्हाही तो ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनद्वारे त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधत होता.

शाहरुख खानने स्वतःबद्दल सांगितले की, जेव्हा तो शूटिंग करत नसतो तेव्हा तो काहीही करत नाही. अलीकडेच किंग खान १ मे रोजी मुंबईत झालेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट’च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होता. यादरम्यान खानला विचारण्यात आले की, तो त्याच्या रिकाम्या वेळेत काय करतो? खानने उत्तर दिले, “माझ्या जवळच्या मित्रांना माहीत आहे की मी सहसा जास्त काही करत नाही.

शाहरुख घरातील कामे करतो.

घरी त्याचे रुटीन काय असते? तो म्हणाला, “मी घरातील कामं करतो, घर स्वच्छ करण्यास मदत करतो आणि माझा मुलगा अबरामला पुस्तके वाचण्यास आणि त्याचा आयपॅड अपडेट करण्यास मदत करतो. मी जास्त कामं करणं आणि अति विचार करणं टाळतो. जेव्हा मी सेटवर नसतो तेव्हा मी प्रामाणिकपणे काहीही करत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खान हा एक फॅमिली मॅन आहे. त्याच्या घराबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी मुलांसोबत खेळतो, पण त्याशिवाय मी दुसरे काहीही करत नाही. या समिटमध्ये शाहरुख खान इतर अनेक गोष्टींबद्दल बोलला. त्याने करण जोहरच्या एका चित्रपटाबद्दलही सांगितले, ज्यामध्ये त्याला संपूर्ण चित्रपटात स्कर्ट घालण्यास सांगितले गेले होते.