बॉलीवूड बादशहा शाहरुख खान आणि त्याचा लाडका मुलगा अब्राम यांनी काही दिवसांपूर्वीच एक ‘फन राइड’ केली होती. ‘बीएमडब्ल्यू ६५०आय’ या कनव्हर्टिबल कारमधून या बाप-लेकांनी फेरफटका मारला होता. त्यांच्या या राइडचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या बाप-लेकांच्या चाहत्यांनी याचा पुरेपुर आनंद लुटला असला तरी त्यावेळी अब्रामच्या सुरक्षेकडे दुर्लक्षच करण्यात आले होते. वांद्रे येथील कार्टर रोडवर शाहरुखने स्वतः त्याची ‘बीएमडब्ल्यू ६’ सिरीजमधील कार मध्यम गतीने चालवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फन राइडमध्ये शाहरुखने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते हे मात्र खरे. अवघ्या तीन वर्षांचा अब्राम त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेला होता. चालकाच्या बाजूला असलेली जागा ही १२ वर्षाखालील मुलांसाठी नसते. हेच कमी होते की काय, अब्रामला मोकळ्या हवेचा आनंद घेता यावा म्हणून एका व्यक्तीने त्याला गाडीच्या सीटवर उभे केले होते. बहुतके देशांमध्ये चालकाच्या बाजूच्या जागेवर १२ वर्षाखालील मुलांना बसवणे बेकायदेशीर मानले जाते. कारण, ही जागा आणि सीटला लावण्यात आलेल्या बेल्टची रचना ही एवढ्या लहान मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली नसते. पर्यायी, अशावेळी लहान मुलांना बसवण्यासाठी गाडीत त्यांच्याकरिता खास सीटची योजना करण्यात येते.

मुव्ही टॉकीजने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओत शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अब्राम हे त्यांच्या फन राइडचा आनंद लुटताना दिसतात. पुढच्या सीटवर त्यांच्यासोबत दुसरा सहचालकही बसलेला दिसतो. यास्थितीत लहान मुलाला दुखापत होण्याचा संभाव्य धोका असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात अद्याप आपल्याकडे पुरेशी जागृती नाही आणि संबंधित कायद्याची कडक अंमलबजावणीही आपल्याकडे केली जात नाही.

सेलिब्रिटींनी समाजासाठी चांगली उदाहरणं प्रस्थापित करणे गरजेचे असते. ते विविध देशांमध्ये प्रवास करत असल्याने त्यांना इतर देशांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेले वाहतुकीचे नियमदेखील चांगलेच माहित असतील. शाहरुख, सलमान खान (जेव्हा तो त्याची सुपरबाइक सार्वजनिक ठिकाणी हेल्मेटशिवाय चालवतो) यांसारख्या कलाकारांनी तर रस्त्यांवर गाडी चालवताना सुरक्षेचा संदेश द्यायला हवा. भारतात २०१५ साली १,४६,१३३ लोकांनी रस्ता अपघातात त्यांचा जीव गमावला. याचाच अर्थ दिवसाला सरासरी ४०० लोकांना त्यांच्या जीवाला मुकावे लागले. यामागे बहुतांशवेळा अपघातांना कारणीभूत वाहनचालक असल्याचेच दिसते. भरधाव वेगाने गाडी चालवून अपघाताला आमंत्रण दिले जाते.

(सौजन्य- फायनान्शिअल एक्स्प्रेस)

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan and son abrams convertible ride was both irresponsible and dangerous
First published on: 23-02-2017 at 14:52 IST