अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) लेक आर्यन खानचं (Aryan Khan) कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरण सगळ्यांनाच ठाऊक आहे. या प्रकरणामुळे आर्यन चर्चेत आला. आर्यनसह शाहरुखला देखील यादरम्यान ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. आर्यन जवळपास महिनाभर तुरुंगात देखील होता. काही महिन्यांपूर्वी त्याला या प्रकरणाबाबत एनसीबीकडून क्लीनचिट देण्यात आली. पण आता पुन्हा एकदा त्याचा पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीने स्वतःवरील Viral Memes केले शेअर, अभिनेत्रीला हसू अनावर, म्हणाली…

क्लबमध्ये पार्टी करत असतानाचा आर्यनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण मंडळींची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच एक मुलगा दारू पिताना यामध्ये दिसत आहे. हा मुलगा आर्यन खान असल्याचं बोललं जात आहे. आर्यनने मास्क लावला आहे. हातात दारूचा ग्लास घेतल्यानंतर तो मास्क खाली करतो आणि पुन्हा चेहऱ्याला मास्क लावत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

आर्यनच्या एका फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. व्हिडीओ शेअर करत असलेल्या व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हॅशटॅग आर्यन खान असं म्हटलं आहे. काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलेला हा मुलगा खरंच आर्यन खान आहे का? हे अद्यापही पूर्ण स्पष्ट झालेलं नाही. पण या व्हिडीओमुळे आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – VIDEO : “अनेकांच्या अनेक शंका होत्या पण…” अमोल कोल्हेंच्या ‘या’ पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर टाकलेल्या छाप्यात आर्यनला अटक करण्यात आली. आता हे संपूर्ण प्रकरण शांत झाल्यानंतर आर्यनने पुन्हा एकदा सगळ्यांसमोर येण्यास सुरुवात केली होती. पण या नव्या पार्टीमुळे त्याला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागणार आहे.