बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता नुकताच ‘डंकी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सौदी अरेबियात होता. तिथे तो उमराह करण्यासाठी मक्का इथं गेला होता. आता शाहरुखने वैष्णोदेवीच्या दरबारात हजेरी लावली आहे. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना आता त्याचा एका नवा लूक समोर आला आहे.

शाहरुख जम्मूहून परतताना मुंबईतील एका खासगी विमानतळावर दिसला. यावेळी पापाराझींनी त्याचे फोटो काढले, मात्र दरवेळी कुल लूकमध्ये असणारा शाहरुख चक्क दोन लपवताना दिसला. अभिनेत्याने आपला चेहरा काळ्या हुडी आणि मास्कमध्ये लपविल होता. यावेळी त्याने कोणाशी संवाद न साधता गाडीत बसून निघून गेला.

Photos : कोणी हॉटेल व्यावसायिक तर कोणी चित्रपटगृहाचा मालक; चित्रपटांच्या व्यतिरिक्त दाक्षिणात्य स्टार्स कमवतात करोडो रुपये

शाहरुख खानचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरवात केली. एकाने लिहले “हिंदू मंदिरात येत असताना इतकी अडचण वाटते का?” तर एकाने लिहले “हा राज कुंद्रा” तर आणखीन एकाने लिहले “चांगले काम करत असताना तोंड का लपवयाचे.” मात्र काहीजणांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला शाहरुख खान त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सौदी अरेबियात होता. तिथले शेड्यूल पूर्ण केल्याची माहिती शाहरुखने एका व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. यानंतर तो मक्का या पवित्र शहरात उमराह करताना दिसला होता. उमराहसाठी पोहोचलेल्या शाहरुखचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.