अभिनेत्री शमा सिकंदर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शमा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे शमा नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिने न्यू यॉर्कमध्ये केलेल्या नव्या फोटोशूटने इंटरनेटवर इंद्रधनुष्याचे रंग पसरवलेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री शमा सिकंदर ‘रेनबो ड्रेस’ मध्ये पोज देताना दिसून आली. या फोटोंमध्ये शमा खूपच कलरफुल आणि ‘चुलबुल’ अवतारात दिसून आली.
शमा सिकंदरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर केले आहेत. यात तिने उन्हाळ्याच्या दिवसात घातला जाणारे ‘रेनबो ड्रेस’ परिधान केल्यामुळे शमा खूपच हॉट दिसतेय. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “तुम्हाला कुठे जायचंय हे महत्त्वाचं नाही, प्रत्येक मार्ग हा तुमच्यासाठी बनलेला आहे…”, असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
View this post on Instagram
शमाचा हा इंद्रधनुष्यातील रंगाचा हा ड्रेस अतिशय विलासी आणि सुंदर आहे. त्याचबरोबर तिचा हा पोशाख परिपूर्ण आहे. यात शमाची मोहक शैली तिच्या फोटोंना आणखी ग्लॅमरस बनवत आहेत. शमाने हे फोटोशूट न्यूयॉर्कमध्ये केलेले दिसून येत आहेत. या फोटोंमध्ये तिच्या मागे मोठ-मोठ्या इमारती दिसून येत आहेत. त्यामुळे तिच्या या फोटोशूटमध्ये चारचॉंद लागले आहेत.
View this post on Instagram
शमा सिकंदरची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूपच आवडली आहे. तिचे हे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केलाय. शमाचे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर २.३ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.