बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये झळकलेले अभिनेते शरत सक्सेना त्यांच्या हटके भूमिकांसाठी ओळखले जातात. शरत यांनी आजवर मिस्टर इंडिया, बागबान, क्रिश, गुलाम, शेरनी यांसारख्या अनेक सिनेमांमधून त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी देखील शरत सक्सेना अगदी फिट आहेत. शरत सक्सेना यांनी नुकतच बॉलिवूडमधील वयोवृद्ध किंवा सिनियर भूमिकांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

सिनेसृष्टी ही तरूण वर्गाची आहे आणि सिनेमांमध्ये एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका असल्यास ती सगळ्यात आधी बिग बी अमिताभ बच्चन यांना ऑफर केली जाते. इतर कलाकारांकडे दूर्लक्ष करून त्यांना अगदी टाकाऊ समजलं जातं असं शरत सक्सेना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

हे देखील वाचा: ‘तिसऱ्या मुलाच्या’ नावावरून करीना कपूरच्या अडचणी वाढण्याची शक्यता!

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘शेरनी’ सिनेमात शरत सक्सेना यांनी महत्वीची भूमिका साकारली होती. त्यानंतर एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. ते म्हणाले, “सिनेसृष्टी ही तरुणांची आहे. इथे वृद्ध व्यक्तींची गरज नाही आणि दुर्भाग्याने आम्ही मरतही नाही आहोत. आम्ही अजून जिवंत आहोत आणि आम्हाला काम करण्याची इच्छा आहे. मात्र वृद्ध लोकांसाठी लिहिल्या गेलेल्या सर्व चांगल्या भूमिका अमिताभ बच्चन यांना दिल्या जातात. जे काही उरलं सुरलेलं असतं ते माझ्या सारख्या लोकांना दिलं जातं आणि मग अनेकवेळा आम्ही ते नाकारतो.” असं म्हणत शरत सक्सेना यांनी व्यथा मांडली.

हे देखील वाचा: दोन महिन्यांपूर्वीच दिया मिर्झा झालीय आई पण…

यामुळे ७१ वर्षांंचे असतानाही शरत सक्सेना आहेत फिट

वयस्कर अभिनेत्यांसाठी अगदी कमी भूमिका असल्याने तरुण दिसण्यासाठी ते स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात असं शरत सक्सेना म्हणाले. यासाठी ते दररोज २ तास व्यायाम करतात. ते म्हणाले, ” मी माझे केस आणि मिश्या काळ्या करतो. शेअरनी मध्ये माझा लूक पाहिला असेल. मला स्वत:ला ५०-५५ वर्षांचं दिसायचंय, नाहीतर मला काम मिळणार नाही.” असं ते म्हणाले.

शरत सक्सेना यांनी आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये बड्या कलाकारांसोबत काम केलंय.