प्रदर्शनाला जवळपास २ महिने उलटून गेलेले असतानाही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काहींना या चित्रपटाला काल्पनिक म्हटलं तर काहींना एक विशिष्ट विचारधारा लोकांमध्ये रुजवण्याचं काम हा चित्रपट करतोय असा आरोप या चित्रपटावर केला. त्यानंतर आता काँग्रेस नेता शशी थरूर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या याच चित्रपटाच्या मुद्द्यावरून ट्विटर वॉर सुरू झालं आहे.

सिंगापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला. चित्रपटावर बंदी घालताना, ‘मुस्लिमांची एकच बाजू मांडून चित्रपट लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला’ असं कारण देण्यात आलं. ज्याचं एक आर्टिकल शेअर करत शशी थरूर यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं, ‘भारतात सत्तेत असणाऱ्या पक्षानं प्रमोट केलेला चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’वर सिंगपूर फेस्टिव्हलमध्ये बंदी घालण्यात आली.’ आपल्या ट्वीटमधून त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

शशी थरूर यांच्या या ट्वीटला चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील एक ट्वीट करत उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, ‘सिंगापूर जगातील सर्वात प्रतिगामी सेन्सॉर आहे. त्यांनी तर ‘द लास्ट टेम्पटेशन ऑफ जिजस ख्रीस्ट’वरही बंदी घातली होती. एवढंच नाही तर रोमँटिक चित्रपट ‘द लीला हॉटेल फाइल्स’वरही बंदी घातली जाईल. त्यामुळे कृपया काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची खिल्ली उडवणं थांबवा.’

विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्वीट केलं असून त्यात त्यांनी शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं, ‘तुमची पत्नी दिवंगत सुनंदा पुष्कर या कश्मिरी हिंदू होत्या? जर हा स्क्रीनशॉट खरा असेल तर त्यांचा सन्मानार्थ तुम्ही हे ट्वीट डिलिट करायला हवं.’ या ट्वीटमध्ये त्यांनी सुनंद पुष्कर यांच्या ट्वीटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात त्यांनी काश्मिरी हिंदू असल्याचा उल्लेख केला आहे.

दरम्यान विवेक अग्निहोत्रींच्या या ट्वीटवर मात्र अद्याप शशी थरूर यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ते यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. काश्मिरी पंडितांची हत्या आणि त्यांचं स्थलांतर यावर या चित्रपटाची कथा आधारित असून विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.